There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
पैसा मिळवणे सोपे आहे, तो राखणे अवघड आहे आणि महिलांसाठी तर ते खडतर आव्हान आहे....!
आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला भगिनी आपल्या कर्तृत्वाने अतिशय उत्तम कार्य करीत आहेत. त्यांची कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि निष्ठापूर्वक काम करण्याच्या स्वभावाने त्यांनी प्रगती केली आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी आपले करिअर विकसित करताना जवळपास सर्व क्षेत्रे पादाक्रांत केली आहेत. नोकरी असो, संशोधन असो आणि आज तर लष्करी सेवा, अवकाश क्षेत्रांमध्येही महिला महत्त्वाचे योगदान देत आहेत. यामुळे साहजिकच महिलांना आर्थिक उत्पन्नाचे स्रोत प्राप्त झाले आहेत. त्यांच्याकडे पैसा आला आहे. त्यांचे स्वतःचे उत्पन्न त्यांना प्राप्त झाले आहे. त्या कमावत्या झाल्या आहेत. त्यांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे. आर्थिक शक्ती आर्थिक बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. निर्णय क्षमता वाढली आहे. एक प्रकारचे चैतन्य प्राप्त झालेले आहे. नोकरी न करणाऱ्या गृहिणी याही प्रपंचाला, कुटुंबाला सर्व प्रकारे सहाय्य करीत असतात. सतत कष्ट करीत असतात. त्यांनाही मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबाकडून, पतीकडून आर्थिक बळ प्राप्त होत आहे.
मात्र या सर्व परिस्थितीमध्ये महिला स्वतःच्या आर्थिक नियोजनाकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देतात का? त्याचा विचार करतात का? केवळ स्वतःसाठी आणि स्वतःच्या आर्थिक नियोजनाचा विचार करतात का? स्वतःच्या भविष्याचा विचार करून त्यासाठी पैसा, संपत्ती राखून ठेवतात का? स्वतःच्या आर्थिक भविष्याचा विचार करतात का? याचे उत्तर नाही असेच आहे. काही अपवाद वगळता महिला स्वतःच्या आर्थिक नियोजनाचा विचार करीत नाहीत हे कटू असले तरी सत्य आहे. अर्थात आपल्या देशातील एकत्रित कुटुंब व्यवस्था आणि पारंपारिक समाज व्यवस्था यामुळे महिला असा विचार करीत नाहीत, करू शकत नाहीत ही गोष्ट ही खरी आहे. आपले कुटुंब, मुले, आई वडील, सासू सासरे, पाहुणे रावळे, सण, उत्सव, कुलाचार, परंपरा यांची सर्व जबाबदारी अप्रत्यक्षरित्या महिलांवरच असते. त्यासाठी सगळ्यात जास्त कष्ट त्यात करतात. त्यांचे वागणे अत्यंत जबाबदारीचे असते. त्यामुळे त्या स्वतःकडे फारसे लक्ष देत नाहीत. स्वतःच्या आर्थिक नियोजनाचा विचारही त्यांच्या मनाला शिवत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
आजच्या गतिमान जीवनपद्धतीमध्ये करिअरवर फोकस करणाऱ्या, एकट्या राहणाऱ्या, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा, परित्यक्ता अशाच महिलांची संख्याही मोठी आहे. कुणावर कधी कशी वेळ येईल हे आज सांगता येत नाही. अशा वेळी पैसा अत्यंत सहाय्यक ठरतो हे माहित आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अतिशय विचारपूर्वक नम्रतेने असे निवेदन करावेसे वाटते की महिलांना आपल्या आर्थिक नियोजनाकडे लक्ष देणे आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक बनले आहे. त्यातून त्यांच्या क्षमता अधिक विकसित होतील आणि त्या अधिक चांगल्या पद्धतीने जीवनाचा आनंद घेऊ शकतील. सर्व वयोगटातील महिलांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. नोकरी करणाऱ्या, व्यवसायिक, गृहिणी आणि अगदी निवृत्त महिलांनीही या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे. स्त्री / पुरुष सर्वांनी या कार्यशाळेसाठी नोंदणी करावी.
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र