सण व उत्सवांमागील विज्ञान आणि वैज्ञानिक विचार
Contact us

₹799

कार्यशाळेतील विषय

भारतीय संस्कृती ही पशू, पक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत, निसर्ग आणि संपूर्ण सृष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. आपल्या प्रत्येक सण-उत्सवातून निसर्गसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, सहजीवन आणि जीवनमूल्यांचा संदेश दिला जातो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या भारतीय संस्कृतीतील अनेक छोटे-मोठे सण, उत्सव आणि परंपरा हळूहळू लुप्त होत चालल्या आहेत. या सणांमागील कथा, विज्ञान, आरोग्य, पर्यावरण आणि जीवनमूल्ये समजून घेऊन त्यांचा खरा अर्थ पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आजची गरज आहे. भारतीय संस्कृतीत सण आणि उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे निमित्त नाहीत, तर घर, मन आणि शरीरात चैतन्य, सकारात्मक ऊर्जा, उत्साह आणि एकात्मता जागवणारे संस्कार आहेत. घराची स्वच्छता, रांगोळी, तोरण, दीपप्रज्वलन, पूजा आणि उत्सव या प्रत्येक कृतीमागे एक शास्त्रीय व सांस्कृतिक विचार दडलेला आहे.

🌼 भारतीय सण आणि उत्सव हे केवळ धार्मिक विधी नसून, शरीर, मन, समाज, निसर्ग आणि संस्कृती यांच्यात समतोल निर्माण करणारी जीवनपद्धती आहेत.
✨ परंपरा जपूया... विज्ञान समजून घेऊया... आणि भारतीय संस्कृतीचा खरा अर्थ जाणून घेऊया...

या कार्यशाळेत जाणून घ्या :

🌾 मकरसंक्रांत – तीळ आणि गूळ हिवाळ्यातच का?
🌿 श्रावण महिना – बेलपत्र, रुद्राभिषेक, सोमवार व्रत, श्रावणातील कथा आणि त्यांचे माहात्म्य
🐘 गणेशोत्सव – २१ पत्री, दुर्वा, मोदक आणि त्यांच्या मागील शास्त्रीय व आयुर्वेदिक महत्त्व
🌸 हरितालिका – पार्वती मातांच्या तपश्चर्येचे तत्त्वज्ञान आणि व्रताचे महत्त्व
🐍 नागपंचमी – नागपूजेमागील पर्यावरणीय आणि सांस्कृतिक विचार
🚩 गुढीपाडवा – गुढी आणि कडुनिंबाचे महत्त्व
🪷 नवरात्र – घटस्थापना, अखंड नंदादीप आणि शक्ती उपासनेमागील तत्त्वज्ञान
🐂 पोळा – कृषीसंस्कृतीतील बैलांचे स्थान आणि कृतज्ञतेची भावना
👶 पिठोरी अमावस्या – मातृत्व, संततीकल्याण आणि कुटुंबसंस्कार

या कार्यशाळेत जाणून घ्या :

🪔 दिव्यांची अमावस्या – दिव्यांचे पूजन, प्रकाशाचे प्रतीक आणि घरातील सकारात्मक ऊर्जेचे महत्त्व
🌳 वटपौर्णिमा – वडाच्या वृक्षाचे पर्यावरणीय आणि आयुर्वेदिक महत्त्व
🪔 दिवाळी – अभ्यंगस्नान, उटणे, दिवे आणि लक्ष्मीपूजनाचे महत्त्व
प्रत्येक सण-उत्सवामागील कथा, इतिहास आणि तत्त्वज्ञान.
✨ चातुर्मासाचे शास्त्रीय, आरोग्यदायी आणि आध्यात्मिक महत्त्व.
✨ घराची स्वच्छता, रांगोळी, तोरण, दीपप्रज्वलन, पूजा-विधी आणि त्यामागील वैज्ञानिक व सांस्कृतिक विचार.
✨ घर, मन आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा जागवणाऱ्या भारतीय परंपरा.
✨ ऋतूनुसार आहार-विहार, उपवास आणि जीवनशैलीमागील विज्ञान.

डॉ. प्राची मलमकर

वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शक
डॉ. प्राची मलमकर गेल्या १५+ वर्षांपासून "Prachi Vastu" या नावाने भारत व विदेशात वास्तुशास्त्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करत आहेत. त्या वास्तुशास्त्र विषयातील डॉक्टरेट आहेत. त्यांनी अकल्ट सायन्स मधले 50 पेक्षा अधिक शाखेमध्ये सर्टिफिकेट प्राप्त , पुराण ग्रंथ, , रमल, डाऊझिंग, remedies,नक्षत्र वाटिका, यांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांची शैक्षणिक योग्यता इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, इंटिरियर डिझाइन, बी.ए. वेदांग ज्योतिष, एम. ए .हिंदू धर्मशास्त्र इतिहास,डिप्लोमा इन भगवद्गीता (मुंबई विद्यापीठ) डिप्लोमा इन नॅचरोपॅथी , डिप्लोमा इन इंडियन नॉलेज सिस्टीम इत्यादी. अशी आहे सध्या धर्मशास्त्राचा इतिहास यांचा अभ्यास करत आहेत. त्यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार आणि "कॅप्टन ऑफ पिरॅमिड, इजिप्त" हा सन्मान प्राप्त. 25+ पुरस्कार प्राप्त.

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

4 ते 7 ऑगस्ट, 2026 

रात्री 8 ते 9

ऑनलाईन सत्र