There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
कहाण्या ऐका... हो... कहाण्या ऐका... निःशुल्क ऐका...
ऐका परमेश्वरा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या. एक नावडती होती... आणि जसा विश्वेश्वर तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना होवो. ही साठां उत्तराची कहाणी पांचां उत्तरी सुफळ संप्रूण (संपूर्ण).
कहाण्या ऐका...हो...कहाण्या ऐका... निःशुल्क ऐका...
श्रावण महिन्यात 25 जुलै ते 23 ऑगस्ट रोज रात्री 9 ते 9:35 pm
चातुर्मास कहाण्या...
श्रावण महिन्यामध्ये आणि चातुर्मासामध्ये कहाणी ऐकणे हा एक अत्यंत रोमांचकारी अनुभव असतो. आपला संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून कहाण्या सांगण्याची आणि कहाण्या ऐकण्याची परंपरा आहे. पुराणे ऐकण्याची, रामायण, भागवत, हरिविजय, धार्मिक ग्रंथ, ऐकण्याची परंपरा आहे.
विश्व मंदिर परिषद सादर करीत आहे.
श्रावण कहाणी मास... श्रावण महिन्यात रोज कहाण्या ऐका...
यामध्ये कहाणी सोमवारची खुलभर दुधाची, कहाणी सोमवारची शिवामुठीची, कहाणी मंगळागौरीची, कहाणी बुधबृहस्पतीची, कहाणी शुक्रवारची देवीची, कहाणी शनिवारची मारुतीची, कहाणी नागपंचमीची, कहाणी मंगळागौरीची, कहाणी वर्णसठीची, कहाणी पाचादेवांची... अशा विविध कहाण्या आहेत. त्यांची रचना विशिष्ट प्रकारची असते. या कहाण्या सांगण्याचे एक विशिष्ट चाल असते. या कहाण्या ऐकून आपले मन आणि हृदय एका आगळ्यावेगळ्या आनंदाने भरून जाते. एक सात्विक, धार्मिक आणि प्रसन्न संस्कार आपल्यावर नकळत घडत असतो.
या कहाण्यांना एक लय असते, एक ताल असतो. त्या आपल्याला मंत्रमुग्ध करतात. अत्यंत रसाळ वाणीमध्ये आणि पारंपारिक चालीमध्ये कहाण्यांचा आनंद घ्या. विशेषतः लहान मुलांना कहाण्या ऐकवा. आपणही ऐका... ज्येष्ठांनाही या कहाण्या एका पुनः आनंदाचा प्रत्यय आणून देतील.
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र