There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
मार्गदर्शक : महेश शेंद्रे
🎥आजचं युग हे डिजिटल युग आहे. माहितीचे वेगवान आदानप्रदान हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य आहे आणि त्यासाठी अत्यंत सोपं असं तंत्रज्ञान आता उपलब्ध झालं आहे. पूर्वी कॅमेरा, फिल्म, व्हिडिओ कॅमेरा ही विशिष्ट लोकांची मक्तेदारी होती. मात्र आता डिजिटल क्रांतीने सर्व काही सोपे झाले आहे. स्मार्ट फोनने एक विलक्षण क्रांती केली आहे. त्याचबरोबर व्हॉट्सअप आणि यूट्यूबने आपल्याला संपर्काची आणि वितरणाची असंख्य दालने उघडून दिली आहेत. मात्र हे सर्व जरी खरे असले तरी बेसिक कौशल्य आवश्यक असते. यंत्रे आणि तंत्रज्ञान जरी सोपे आणि सहज उपलब्ध असले तरी ते कसे हाताळायचे ते कळणे आवश्यक असते. विविध माध्यमातून शॉर्ट फिल्म्स कशा बनवायच्या? डॉक्यूमेंटरी कशी तयार करायची? रेकॉर्डिंग कसे करायचे, एडिटिंग कसे करायचे? यासंबंधी बेसिक कौशल्ये सांगणारी ही एक विशेष कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केली आहे.
🗓️ दिनांक: 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर, 2025
🕗 वेळ: रात्री 8 ते 9
◻️कालावधी: चार दिवस, रोज एक तास
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◻️कार्यशाळेतील विषय:
✅ शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंटरी फिल्म आणि फिल्म ( चित्रपट ) म्हणजे काय आणि यातील फरक
✅ डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म यातील विषय, आशय कालावधी व प्रकार
✅ फिल्म मेकिंग स्टेप्स - प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन.
✅ फोटोग्राफी किंवा शूटिंग करण्याचे दहा मूलभूत सिद्धांत.
✅ कॅमेऱ्याचे विविध शूटिंगचे अँगल आणि शूटिंगची स्टाईल
✅ एडिटिंग ही प्रक्रिया काय आहे ?
✅ एडिटिंग साठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर व प्रत्यक्ष एडिटिंग.
✅ डॉक्युमेंटरी फिल्म शॉर्ट फिल्म आणि चित्रपट या क्षेत्रामध्ये असलेली करिअरची संधी?
प्रसिद्ध दिग्दर्शक, संकलक, आणि कॅमेरामन, 27 वर्षे मीडिया क्षेत्रात, राष्ट्रीयस्तरावर पारितोषिक विजेते
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र