सेकंड इनिंग अर्थात चाळीशी नंतरचे करिअर
Contact us

₹799

कार्यशाळेतील विषय

सेकंड इनिंग अर्थात कार्यक्षम जीवनाचा दुसरा टप्पा...... साधारणपणे वयाच्या विशी पंचविशीमध्ये जीवनाचा आणि करिअरचा पहिला टप्पा - पहिली इनिंग सुरू होते. शिक्षणानंतर मिळेल ती नोकरी पकडणे, किंवा जमेल तो व्यवसाय, कामधंदा करणे हा जीवनाचा पहिला टप्पा असतो. शिक्षण संपून स्थिर जीवनाकडे जाण्यासाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो. नोकरी आणि मग छोकरी... अर्थात विवाह होतो आणि संसाराला - प्रपंचाला सुरुवात होते. आपल्या इच्छेनुसार आपल्या आवडीच्या क्षेत्रात किंवा मग आपल्या शिक्षणानुसार आणि मिळणाऱ्या संधीनुसार नोकरी स्वीकारून करिअरची सुरुवात होते. साधारण पुढची पंचवीस तीस वर्षे ही पहिली इनिंग सुरू राहते. या दरम्यान मुले होतात, घर होते, गाडी येते. जीवनाच्या किमान अपेक्षा पूर्ण होतात. मुलांचे शिक्षणही पूर्ण होते. जबाबदाऱ्या पूर्णत्वाकडे जात असतात. अशा वेळी अनेकदा नोकरीच्या ठिकाणी तसेच एकंदर जीवनात तोच तोच पणा येतो. रोज उठून तोच तो जॉब, तीच माणसे, तेच काम, तेच जीवन.... अशावेळी काहीतरी बदल घडावा असे वाटू लागते. दुसरी काहीतरी करावे असे वाटू लागते. काहीतरी नवीन शिकावे, काहीतरी वेगळे कौशल्य मिळवावे आणि आपल्या जीवनात, कामात बदल घडावा असे प्रकर्षाने वाटू लागते. मात्र याच वेळी आर्थिक गरजा असतातच. कौटुंबिक जबाबदाऱ्याही असतात. त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत सुरू राहणे, हेही आवश्यक असते. मिळकत थोडी कमी झाली तरी चालेल, पण जीवनात काहीतरी बदल घडावा, नवे काहीतरी घडावे असे वाटू लागते. याचवेळी सुरू होते सेकंड इनिंग...! साधारणपणे पंचेचाळीस - पन्नाशीच्या वयात सेकंड इनिंगचा विचार आपल्या मनात प्रकर्षाने घोळू लागतो. अशावेळी नक्की काय करायला हवे? सेकंड इनिंग कधी सुरू करावी, सेकंड इनिंगचे फायदे तोटे? सेकंड इनिंग सुरू करताना कोणती काळजी घ्यावी? अशा महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन आणि चर्चा असे या कार्यशाळेचे स्वरूप आहे.

🗓️दिनांक: 18 ते 21 नोव्हेंबर, 2025
🕗वेळ: रात्री 7.30 ते 8.30
🎥ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे

प्रा. क्षितिज पाटुकले

प्रख्यात लेखक, अर्थतज्ज्ञ, माजी संचालक - इन्शुरन्स अकॅडेमी, रिटायरमेंट प्लॅनिंग या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक

कार्यशाळेतील विषय 

✅ सेकंड इनिंग संकल्पना
✅ सेकंड इनिंगची गरज
✅ सेकंड इनिंगची तयारी
✅ बदलते करिअर विश्व
✅ नोकऱ्यांचे आजचे वास्तव
✅ जीवनाचे आणि जीवन प्रवासाचे नियोजन
✅ सेकंड इनिंगचे आर्थिक नियोजन
✅ सेकंड इनिंग - जोखीम आणि फायदे तोटे
✅ जीवनाचे ध्येय ठरवणे गोल सेटिंग
✅ सेकंड इनिंग सुरू करताना घ्यायची काळजी
✅ सेमी स्कील करिअर्स
✅ स्किल करिअर्स
✅ किमान गुंतवणुकीतील व्यवसाय –धंदे
✅ सपोर्टिव्ह - सप्लीमेंटेटी करिअर्स
✅ पूर्णतः नविन करिअर्स
✅ सेकंड इनिंग कडून थर्ड इनिंगकडे अर्थात रिटायरमेंट प्लॅनिंग कडे

ऑनलाईन सत्र 

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

लाईव्ह मार्गदर्शन 

अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी   

सुसंस्कारित अभ्यासक्रम 

तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम

कम्युनिटी व नेटवर्किंग

एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क

तज्ज्ञ मार्गदर्शक

आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे 

मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान 

ई - प्रमाणपत्र 

कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र