There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
नवरात्री निमित्ताने विश्व मंदिर परिषद सादर करीत आहे एक विशेष ऑनलाईन प्रवचनमाला
देवी महात्म्य अर्थात दुर्गा सप्तशक्ति (चंडी पाठ)
मार्गदर्शक : प्रा. प्रणव गोखले
🗓️ दिनांक: 22 ते 30 सप्टेंबर, 2025
🕗 वेळ: सकाळी 8 ते 9
मार्कंडेय पुराणांमध्ये देवी महात्म्याचे वर्णन केलेले आहे. आदिशक्ती दुर्गा मातेच्या स्वरूपाचे आणि पराक्रमाचे वर्णन यामध्ये आलेले आहे. हिंदू धर्म परंपरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे देवी महात्म्य हा ग्रंथ आहे. यामध्ये एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. मधु , कैटभ ,महिषासुर अशा राक्षसांबरोबर दुर्गादेवीचे युद्ध आणि त्यातून राक्षसांचा मृत्यू असे याचे स्वरूप आहे. दुर्गा देवीला महिषासुरमर्दिनी असे म्हटले आहे. देवी महात्म्यमध्ये दैवी शक्तीला स्त्री रूपामध्ये पाहिलेले आहे आणि तिने या पृथ्वीची कशी रचना केली आहे याचे मनोहरी वर्णन केले आहे. संपूर्ण ब्रम्हांडाची निर्माती देवी असून तिने सप्तमातृका - सप्तमातांच्या सहायाने ही निर्मिती केली आहे. धर्माचे रक्षण केले आहे. त्याचे वर्णन देवी महात्म्यांमध्ये आहे . यामध्ये देवी एक भयंकर सिंहावर आरुढ झालेली असून तिला अनेक हात आहेत, प्रत्येक हातामध्ये तिने शस्त्र धारण केलेले आहे, असे वर्णन आहे . शंकरांची पत्नी महादेवी पार्वती अर्थात दुर्गा यांना धर्माचे रक्षण करणारी सर्वोच्च, सर्वशक्तीमान शक्ती म्हणून अत्यंत पूज्य मानले गेले आहे .
नवरात्रीमध्ये देवी महात्म्याचे श्रवण करणे आणि ते समजून घेणे अत्यंत पुण्यदायी आहे अशी श्रद्धा आहे. प्राध्यापक प्रणव गोखले यांच्या ओजस्वी आणि रसाळ वाणी मध्ये देवी महात्म्य समजून घेणे ही एक अतिशय आनंददायी अशी अनुभूति आहे.
प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान