There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
मार्गदर्शक : डॉ. स्मिता त्रिगुण कुलकर्णी
🕉️कार साधना ही फार प्राचीन काळापासून चालत असलेली विश्व स्पंदनांना आपल्या शरीराभोवती कार्यरत करायला उद्युक्त करणारी अशी एक साधना - चिकित्सा पद्धती आहे. ॐकार म्हणजेच प्रणव अर्थात हा विश्वनिर्मिती नंतरचा पहिला ध्वनी आहे असा विश्वास आहे. ॐकार साधना याचा अर्थ ॐकाराच्या उच्चारातून, ॐकाराच्या आवर्तनांमधून आरोग्याचे आणि पंचकोषांचे संतुलन असा आहे. ॐकार साधना अत्यंत प्रभावी असून तिचे मानवी आरोग्याच्या दृष्टीने खूप लाभ आहेत. विशेषता: मनोकायिक म्हणजे सायकोसोमॅटिक (अर्थात बी.पी., शुगर, हार्ट, कॅन्सर, अॅसिडिटी, इ.) विकारांमध्ये ॐकार साधना अतिशय उपयुक्त आहे. आजच्या अत्यंत गतिमान जीवनशैलीमध्ये ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि अतिरिक्त उत्साह मिळवण्यासाठी ॐकार साधना महत्त्वाचे कार्य करते. त्याचबरोबर इम्युनिटी अर्थात प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी, षटचक्रांच्या शुद्धीसाठी, पंचकोषांच्या संतुलनासाठी, भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ॐकार साधना गुणकारी आहे. श्वासोच्छवास आणि आवाज याचे शुद्धीकरण करण्यासाठी आणि वाणीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. मन:शांती हा ॐकार साधनेतून मिळणारा बोनस लाभ आहे. दीर्घायुष्यासाठी ॐकार साधना ही एक उत्तम प्रकारची सवय आहे. आपले आरोग्य उत्तम राखणाऱ्या या बिनखर्चाच्या चिकित्सा पद्धतीची माहिती करून घेण्यासाठी प्रत्येकाने ओंकार साधना समजून घेणे आवश्यक आहे.
मानसतज्ज्ञ, समुपदेशक, योग थेरपिस्ट, स्वेच्छानिवृत्त उपजिल्हाधिकारी
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र