निवेदन सूत्रसंचालन मुलाखत
Contact us

₹851

कार्यशाळेतील विषय

✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकाणाची पूर्व तयारी
✅ कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
✅ निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
✅ कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
✅ निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
✅ आवश्यक नियमित व्यायाम व साधना
✅ विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

विघ्नेश जोशी 

प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार

7 ते 9 ऑगस्ट, 2026

रात्री 9.30 ते 10.45

ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

मार्गदर्शन प्रात्यक्षिके प्रश्नोत्तरे 

ई-प्रमाणपत्र

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन सत्र 

अभिप्राय

"कार्यशाळा अत्यंत उपयुक्त व प्रेरणादायी वाटली. प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे समजली. या कार्यशाळेमुळे आत्मविश्वासाने बोलणे, योग्य शब्दांची निवड करणे, आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याच्या पद्धती यासारख्या अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. मुलाखत तंत्राबाबतही प्रश्न विचारण्याची पद्धत, समोरच्याचे विचार समजून घेणे आणि संवाद अधिक प्रभावी बनवण्याचे कौशल्य शिकायला मिळाले. या सर्व गोष्टींमुळे या क्षेत्रात काम करण्याची निश्चितच प्रेरणा मिळाली."

श्रीमती रूपाली रमेश बेहरे

"निश्चितच! कार्यशाळा अत्यंत फलदायी झाली. निवेदन आणी सूत्रसंचालनाचे बारकावे शिकायला मिळाले. विघ्नेशजी जोशी यांचे कडून अत्यंत सूक्ष्मस्तरावर काम करण्याची प्रेरणा प्राप्त झाली. त्यांचा व्यासंग अलोकिक आहे. परत जेव्हा केव्हा अशी कार्यशाळा होईल तेव्हा पुन्हा पुन्हा करण्यास आनंदच होईल.... मार्गदर्शकाचा विडिओ व्यवस्थित त्याला फोकस करत असल्यास देहबोली समजायला मदत होईल.... मनःपूर्वक धन्यवाद!

- रोटरीयन फार्मासिस्ट मिलिंद भालचंद्र गंपावार

"निवेदन आणि सुत्रसंचालन ही कार्यशाळा मी पहिल्यांदा अटेंड केली होती. सुत्रसंचालन आणि निवेदन करताना, मुलाखत घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, आपली देहबोली, भाषा आणि कार्यक्रमाची तयारी कशी करावी, याबद्दल सरांनी खूप सखोल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेपूर्वी काही गोष्टींची मनात साशंकता होती. पण या कार्यशाळेनंतर ती शंका पूर्णपणे सोडवली गेली. या कार्यशाळेसाठी सरांचे खूप खूप धन्यवाद."

- अनुराधा तुकाराम धावडे