भारतीय शास्त्रीय संगीतातील कोणत्या स्वरांचा, रागांचा आपल्या शरीर क्रीया आणि मनावर कसा परिणाम होतो यावर आधारित उपचार म्हणजेच संगीतोपचार... ही थेरपी विविध प्रकारच्या मनोकायिक व्याधींवर अतिशय उपयुक्त अशी सहाय्यक किंवा पूरक उपचारपद्धती आहे. आजच्या आधुनिक जीवनशैली मुळे काही आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. (उदा. निद्रानाश , बीपी, डायबिटीस, हार्मोनल इम्बॅलन्स, इ.) तर काही आजार दुर्धर आणि असाध्य आहेत . (उदा. हृदयरोग, स्मृतिभ्रंश, पार्कीन्सन्स, अल्झायमर, इ.) गतिमान जीवनशैली, मानसिक ताणतणाव यातून या व्याधी निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारच्या आजारावर उपयुक्त सहाय्यक थेरपी म्हणून म्युझिक थेरपी लोकप्रिय होत आहे.
👉ही कार्यशाळा कोणासाठी :
✅ संगीत क्षेत्रातील विद्यार्थी, गायक, वादक, कलाकार, डॉक्टर्स, वैद्य, थेरपीस्ट.
✅ विविध आजारांनी ग्रस्त अशा रुग्णांसाठी.
✅ निरोगी लोकांमध्ये स्वास्थ्य टीकवून ठेवण्यासाठी.
✅ सर्वसामान्य लोकांसाठीही ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त...
◻️ कार्यशाळेतील विषय:
✅ मानवी जीवनात संगीताचे महत्त्व.
✅ भारतीय शास्त्रीय संगीताची ओळख.
✅ संगीतोपचार - संकल्पना, समज, गैरसमज.
✅ शास्त्रीय विवेचन. (Scientific aspects of music therapy)
✅ संगीतोपचार तंत्र
✅ संगीतोपचार कोणासाठी?
✅ शारीरिक मानसिक आजारांवर उपयुक्तता.
✅ संगीतोपचाराची व्याप्ती, उपयुक्तता आणि मर्यादा.
✅ संगीतोपचारातील करिअर संधी.
मार्गदर्शक
डॉ. श्रुती गोडबोले
आयुर्वेदाचार्य, संगीत विशारद प्रथम, योगशास्त्र पदविका, Government Certified संगीतोपचार तज्ज्ञ