ललित लेखन
Contact us

शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी व मुक्तपणे, ललित्यपूर्ण लिहू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक कार्यशाळा...

₹849

लिहिण्याची, व्यक्त होण्याची उर्मी असतेच आपल्यात... प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात सांगण्यासारख्या, व्यक्त होण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्यक्त होण्याला मुक्त व्यासपीठदेखील मिळालेले आहे. अशाच लेखनातून पुढे आपण अधिक दर्जेदार ललित साहित्य लिहावं, आपल्या लेखनाला एक साहित्यिक उंची प्राप्त व्हावी असे वाटते. मात्र त्याचे रीतसर प्रशिक्षण उपलब्ध नसते. आपल्याला जे व्यक्त व्हायचे आहे ते साहित्याच्या कोणत्या प्रकारात येतं? मुळात साहित्य म्हणजे काय? ललित म्हणजे काय? आपल्याला जे लिहावसं वाटतं त्याचा नक्की प्रकार कोणता? आपल्या लेखनाची शैली कोणती? आपण अधिक चांगल्या प्रकारे लिहिण्यासाठी कोणता सराव, अभ्यास करायला हवा याची उत्तरे शोधण्याची कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळेच ही त्रुटी दूर करणारी ललित लेखन या विषयावरील कार्यशाळा विश्व मराठी परिषदेने आयोजित केलेली आहे.

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

प्रख्यात लेखिका, संपादिका, समीक्षक आणि अभिवाचक
संवादसेतू दिवाळी अंकाच्या संपादक आणि 'केल्याने भाषांतर' त्रैमासिकाच्या शैलीसंपादक. 
मराठी साहित्याच्या अभ्यासक असून गेली वीस वर्षे विविध नियतकालिकांमधून सातत्याने समीक्षा-संशोधनपर तसेच ललितलेखन.  रोहिणी निरंजनी हे विदुषी रोहिणी भाटे यांचे चरित्र प्रसिद्ध असून त्याला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्यासाठीचा पुरस्कार, तसेच अभिव्यक्ती पुरस्कार. 
संपादित सानिया,  निवडक मंगला गोडबोले,  कथायात्रा,  कथादीपावली,  पांथस्थ,  सीतेची गोष्ट आणि इतर कथा ही संपादित पुस्तके प्रकाशित.
आकाशवाणी, कम्युनीटी रेडिओ यांसारख्या श्राव्य माध्यमांसाठी व साहित्यविषयक लघुपट आणि माहितीपटांसाठी संहितालेखन. 
अनवट शांताबाई, समजुतीच्या काठाशी, आकाशवेडी, इये मराठीचिये नगरी, पाऊसवेळा अशा अनेक रंगमंचीय कार्यक्रमांचे संहितालेखन करून ते सदर करत असतात.
मान्यवर लेखकांच्या मुलाखती घेतल्या असून त्या विविध नियतकालिकांमधून प्रकाशित झाल्या आहेत. 
गेली १० वर्षे कथालेखन कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन.  याशिवाय सूत्रसंचालन आणि मुलाखतीचे तंत्र आणि अभिवाचन यांच्याही कार्यशाळा घेतात.  व्याख्याने, परिसंवाद आणि चर्चासत्रे यांमध्ये वक्ता म्हणून सहभाग.

1

कार्यशाळेतील विषय

✅ साहित्य म्हणजे काय?
✅ साहित्य प्रकारांची ओळख
✅ ललित आणि ललितेतर साहित्य यातील फरक
✅ ललित साहित्याचे प्रकार - कथनपर - कथेतर
✅ ललित साहित्याची ठळक लक्षणे
✅ विविध ललित साहित्यप्रकारांची वैशिष्ट्ये

2

कार्यशाळेतील विषय

✅ ललित साहित्याची लेखनपरंपरा
✅ ललित साहित्यातील लालित्य कसे ओळखायचे?
✅ विविध माध्यमांसाठी लिहिताना पाळायची पथ्ये
✅ भाषाशैलीसाठी काय करायचे?
✅ ललितलेखनासाठी नित्य अभ्यासाच्या पद्धती कोणत्या?

3

कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?

✔️ नवोदित लेखक, साहित्याचे अभ्यासक : ज्यांना आपले अनुभव जगासमोर मांडायचे आहेत व ललितलेखनातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे.
✔️ विद्यार्थी आणि शिक्षक / प्राध्यापक : ज्यांना मराठी साहित्याची समज वाढवून आपले ललित लेखनकौशल्य विकसित करायचे आहे.
✔️ ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स : ज्यांना आपल्या दैनंदिन अनुभवांवर आधारित दर्जेदार कंटेंट तयार करायचा आहे
.✔️ शब्दांवाटे व्यक्त होण्याची उर्मी असणाऱ्या प्रत्येकासाठी.

4

कार्यशाळेचे स्वरूप

या कार्यशाळेत मार्गदर्शनासोबत लेखन प्रात्यक्षिक आणि प्रश्नोत्तरातून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल!

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

7 ते 10 जुलै, 2026

संध्या. 8 ते 9

ऑनलाईन सत्र