There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
हवे तेव्हा... हवे तिथे... हवे ते... कीर्तन ऐका...!!!
कीर्तन ही सामूहिक समाजमनावर नैतिक संस्कार करणारी आणि सामाजिक स्वास्थ्य संतुलित राखणारी एक कला आहे. ऐकणाऱ्याच्या मनात एका चैतन्याची जागृती करणारी ही शेकडो वर्षांपासूनची अभिजात अशी सांस्कृतिक परंपरा आहे. कीर्तन प्रवचन ही महाराष्ट्रातील आणि देशातील एक अतिशय समृद्ध परंपरा आहे. भारतीय सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक जीवन समृद्ध होण्यासाठी कीर्तन परंपरेने फार मोठा हातभार लावलेला आहे. सामाजिक शिक्षण, नीतीमूल्यांचा आणि सहिष्णूतेचा प्रचार तसेच सामाजिक ऐक्य यासाठी कीर्तनकलेचे योगदान फार महत्त्वपूर्ण आहे. गेली शेकडो वर्षे अनेक पिढ्यांचे सांस्कृतिक, भावनिक आणि मानसिक पोषण करण्याचे काम हजारो कीर्तनकारांनी केलेले आहे आणि आजही करीत आहेत.
मात्र गेल्या काही वर्षात विशेषत: इंटरनेट आणि मोबाईल यांच्या प्रसारानंतर कीर्तने, प्रवचने आणि तरूण पिढी यांची नाळ तुटल्यासारखे जाणवते. सध्याची गतिमान जीवनशैली आणि वेळेची कमतरता तसेच शहरीकरणामुळे कीर्तनाला जाणे आणि त्याचा आनंद घेणे अवघड बनले आहे. प्रत्येक मराठी, अर्थात भारतीयांना त्याचबरोबर आता परदेशी नागरिकांनाहीकीर्तन ऐकण्याची आणि त्याचा आनंद घेण्याची मनस्वी इच्छा आहे. आता प्रत्येकाला हवे तेव्हा, हवे त्या ठिकाणी हवे ते कीर्तन ऐकतायेईल, पाहता येईल आणि त्याचा आनंद घेता येईल. कीर्तन हे देव, देश आणि धर्म यांचा प्रचार प्रसार करण्याचे, युवापिढीवर संस्कार करण्याचे अतिशय उत्तम माध्यम आहे.
कीर्तन ही मनोरंजनाबरोबरच संगीत, नृत्य, साहित्य, कला, इतिहास, संस्कृती परंपरा यांचीही ओळख आपल्याला करून देतात. मानवी जीवनाला वळण लावण्याचे एक विलक्षण सामर्थ्य कीर्तनकलेमध्ये आहे. यामध्ये नारदीय कीर्तन, वारकरी कीर्तन, रामदासी कीर्तन, राष्ट्रीय कीर्तन, तुकडोजी महाराज संप्रदाय कीर्तन, दासगणू महाराज संप्रदाय कीर्तन, हरिकथा कीर्तन, वैज्ञानिक किर्तन, अन्य संप्रदाय कीर्तन प्रकारांचे सादरीकरण करण्यात येईल. विनम्र आवाहन : कीर्तनकला देश विदेशातील मराठी बांधवांपर्यंत पोहोचावी तसेच युवा पिढीने याचा आनंद घ्यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. कृपया याविषयीची माहिती अधिकाधिक ग्रुप्स आणि सोशल मीडियावर शेअर करा ही विनंती.