कीर्तन प्रवचन अभ्यासवर्ग २०२६
Contact us

होय... तुम्ही सुद्धा कीर्तनकार बनू शकता...प्रवचनकार बनू शकता...

₹24,000

₹27,000

कीर्तन आणि प्रवचन ही एक प्राचीन सांस्कृतिक कला आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट नव्हते तेव्हा कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते हेच सामाजिक आणि सांस्कृतिक अभिसरणाची माध्यमे होती. त्यांच्याद्वारेच समाजाचे मानसिक, भावनिक, नैतिक आणि अध्यात्मिक पोषण होत होते. समाजव्यवस्थेचा रहाटगाडगा व्यवस्थित चालवण्यासाठी आणि समाजाचे नैतिक अधिष्ठान टिकवण्यासाठी कीर्तनकारांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आता पुन्हा एकदा कीर्तनकारांना, प्रवचनकारांना चांगले दिवस येत आहेत. त्याला कारण आहे तंत्रज्ञान! तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपली संस्कृती आणि परंपरा जगभर पोहोचवण्याची संधी कीर्तनकारांना आणि प्रवचनकारांना उपलब्ध झालेली आहे.

डॉ. चारुदत्तबुवा आफळे 

राष्ट्रीय कीर्तनकार 

कीर्तनविश्व समन्वयक, जगभरात 5000 हून अधिक कीर्तने सादर 

अभ्यासक्रमात काय शिकाल ?

✅ कीर्तन परंपरेचा इतिहास आणि अखिल भारतातील कीर्तन परंपरांचा परिचय
✅ संतचरित्रांचा परिचय अधिक त्याविषयी प्रवचन
✅ संत वाङमय परिचय
✅ प्रमुख पाच कीर्तन पद्धतींचे मांडणी तंत्र.
✅ पूर्वरंग - उत्तररंग सहित कीर्तनप्रक्रियेतील सर्व महत्वाचे टप्पे.
✅ कीर्तनासाठी आवश्यक असणारी कंठ संगीतात्मक माहिती
✅ टाळ, मृदंग, वीणा, तबला, पेटी या वाद्यांची ओळख
✅ प्रवचनांसाठी अभ्यासग्रंथांचे मार्गदर्शन
✅ वकृत्व कला, संभाषण कला, संवाद कौशल्य, कथाकथन यांची रहस्ये
✅ कीर्तनकलेचा इतिहास, संस्कृती आणि परंपरा यांचा अभ्यास
✅ कीर्तन आख्यानांची तयारी, पूर्वरंग आणि उत्तररंग, अभ्यास आणि सराव
✅ सादरीकरणाची कौशल्ये, विषयांची मांडणी, पूरक हावभाव, देहबोली, श्लोक, सुभाषिते, भाषांतर, कथानके, उदाहरणे, प्रतिपादन कौशल्ये

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये

✅ उपयुक्त स्टडी मटेरीअल  आणि संदर्भग्रंथांची माहिती
✅ प्रत्येकाला सादरीकरणाची संधी

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

15 जून ते 30 ऑगस्ट

सकाळी 8 ते 9:15