कथालेखन
Contact us

₹799

कार्यशाळेतील विषय

✅ लेखक व्हायचंय, काहीतरी सुचतंय, लिहावं वाटतंय, पण नेमकं काय?

✅ साहित्याचे विविध प्रकार कोणते?

✅ इसापनिती, बिरबलाच्या गोष्टी, कहाण्या ऐकत आपण मोठे होतो पण गोष्ट म्हणजे नेमकं काय?

✅ गोष्ट आणि कथेत काय फरक असतो?

✅ कथेचे आवश्यक घटक कुठले?
✅ कथा बीज कसं निवडायचं?
✅ या बीजाचं कथेत रूपांतर कसं करायचं?

✅ कथेत व्यक्तिरेखा, वातावरण, घटना प्रसंग, संवाद यांचं योग्य मिश्रण कसं हवं?
✅ कथेची सुरुवात आणि शेवट कशी ?
✅ कथेला शीर्षक कसं द्यावं?

नीलिमा बोरवणकर

प्रख्यात कथालेखिका, कादंबरीकार, संपादिका, मुलाखतकार 

मासिके, साप्ताहिके, वार्षिकात जवळपास ७५ कथा प्रसिध्द, २५० हून अधिक मुलाखती, अनेक कव्हर स्टोरीज, सदरलेखन, आकाशवाणी, बालचित्रवाणीसाठी लेखन सादरीकरण, जी. एन. जोशी यांच्यावरील डॉक्युमेंटरीचे लेखन

कथासंग्रह: रंगभान, भवताल, झळाळ

कादंबरी : कार्डीओग्राम, निजखूण, गाज

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे

24 ते 27 ऑगस्ट, 2026

संध्या. 8 ते 9

ऑनलाईन सत्र 

अभिप्राय

"कार्यशाळा माझ्यासाठी एका नव्या कल्पनांची दारं उघडणारी, उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी अनुभव ठरली. कल्पनाशक्ती वाढवणे, कथानक रचना, पात्रनिर्मिती आणि प्रभावी लेखनशैली यांसारख्या अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. या क्षेत्रात काम करण्याची मला नक्कीच प्रेरणा मिळाली असून, भविष्यात एक उत्तम कथा लेखक बनण्याची इच्छा अधिक दृढ झाली आहे."

 - राजेश वसंत उपासनी

"मी एक वाचक आहे मैत्रिणीशी नातेवाईकांशी बोलताना बऱ्याच जणांच्या सांगण्यात आले की लिहित का नाही.... पण तो माझा पिंड आहे की नाही ते कळत नव्हते... त्यासाठी कथा म्हणजे काय.... नेमके काय लिहायला हवे काय नाही हे मुळातच माहित नव्हते.. त्यामुळे ह्या कार्यशाळेचा नक्कीच उपयोग होईल असे आता वाटते आहे... नीलिमा ताईंनी बऱ्यापैकी सगळ्याच अंगांची छान ओळख करून दिली... त्याबद्दल धन्यवाद"

- स्मिता संदीप पाटील

"कार्यशाळा खूप छान झाली. काय लिहावे पेक्षा काय लिहू नये हे किती महत्वाचं असतं ते कळलं. अनेक कथा लिहून झाल्या आहेत परंतु आता त्या या कार्यशाळेत सांगीतलेल्या फॉरमॅट मध्ये बसवून पहाण्याची व नवनवीन कथा लिहिण्रयाची प्रेरणा मिळाली."

 - सौ. सुवर्णा व्यंकट मुळजकर