There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
नवोदित लेखक, कवी, साहित्याचे अभ्यासक व कादंबरीलेखनाचे तंत्र अभ्यासपूर्णरित्या समजून घेऊन आत्मसात करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी...
मार्गदर्शक : डॉ. रवींद्र ठाकूर
कादंबरी हा अत्यंत वाचकप्रिय वाङ्मयप्रकार आहे. मराठी साहित्यविश्र्वावर कादंबरीने आपले गारूड निर्माण केले आहे. लेखकांच्या जीवनानुभवाला, कल्पनाशक्तीला आणि सृजनशक्तीला आवाहन करणारा आणि आव्हान देणारा असा हा वाङ्मयप्रकार लेखकाची कसोटी पाहणारा आहे. महाविद्यालयीन किंवा संशोधनस्तरावर कादंबरी अभ्यासाची सुविधा असली तरी साहित्य/भाषा क्षेत्राव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील व्यक्तींना याचा लाभ मिळवता येणे दुर्लभ आहे. शिवाय अनेक सर्जनशील, अनुभवसंपन्न लेखकांना कादंबरी लेखनाच्या तंत्राचा परिचय करून देणारी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. म्हणूनच विश्व मराठी परिषदेने या अत्यंत उपयुक्त विषयावरील कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या कार्यशाळेत प्रख्यात कादंबरीकार प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर मार्गदर्शन करणार आहेत. महात्मा, धर्मयुद्ध, दाही दिशा, व्हायरस अशा विविध विषयांवरील कादंबरी लेखनासोबत वीसहून अधिक ग्रंथलेखनाच्या माध्यमातून सरांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. कादंबरी लेखनाबाबतचे त्यांचे अनुभवसंपन्न व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन या कार्यशाळेत लाभणार आहे. नवोदित लेखक, कवी, साहित्याचे अभ्यासक व कादंबरीलेखनाचे तंत्र अभ्यासपूर्णरित्या समजून घेऊन आत्मसात करू इच्छिणाऱ्या सर्वांनी या कार्यशाळेत सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.
🗓️ दिनांक: 13 ते 16 ऑक्टोबर, 2025
🕗 वेळ: संध्या. 7:30 ते 8:30
🎥 ऑनलाईन वर्ग: Zoom द्वारे
◻️कार्यशाळेतील विषय :
✅ कादंबरीची पूर्वपीठिका - इंग्रजी आणि संस्कृत
✅ कादंबरी जीवनाचे प्रतिबिंब
जीवनसमांतर वाङ्मय प्रकार
✅ लेखकाचा दृष्टिकोन - Point of View
✅ अवलोकन - आकलन
✅ कादंबरीची भाषा
✅ कादंबरीचे घटक - कथासूत्र, व्यक्तिरेखा, पार्श्वभूमी, घटना प्रसंग
✅ कादंबरीची अभिव्यक्ती, घाट, भाषा, रचना
✅ लेखन - पुनर्लेखन
✅ लेखकाची कसोटी पाहणारा वाङ्मय प्रकार
✅ कादंबरी आणि अन्य वाङ्मय प्रकार
✅ कादंबरीचे प्रकार - ऐतिहासिक, पौराणिक, विनोदी, कल्पित, उपहासिक इ.
मार्गदर्शक
प्रख्यात कादंबरीकार, कवी, समीक्षक,
माजी विभागप्रमुख - मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र