There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
मार्गदर्शक : प्रा. प्रणव गोखलेभाषा : Marathi
श्रीदत्त जयंती निमित्ताने
विश्व मंदिर परिषद आयोजित श्रीदत्तमहात्म्य चिंतनवर्ग (ऑनलाइन)
मार्गदर्शक : प्रा. प्रणव गोखले (प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत आणि धर्मशास्त्र विद्वान)
🗓️ दिनांक: 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर, 2025
🕗 वेळ: संध्याकाळी 8 ते 9
प.प. वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज यांनी श्रीदत्तमहात्म्य हा ग्रंथ रचला आहे. त्यांचे जीवन चरित्र अतिशय अद्भुत आहे. साक्षात श्रीदत्तात्रेय त्यांचेबरोबर सतत बोलत असत. त्यांनीच दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा l हा दैवी सामर्थ्ययुक्त मंत्र आणि घोरकष्टोद्धरण हे सर्व कष्टांचे हरण करणारे स्तोत्र आपणा सर्वांना प्रदान केलेले आहे. श्रीदत्त महात्म्य हा अपूर्व असा ग्रंथ असून त्याची उत्कट प्रचिती प्रत्येकाला येतेच येते. मंत्र, योग आणि भक्ती तीनही मार्गांनी जीवन कसे सफल होते याचे वर्णन श्री दत्तमहात्म या ग्रंथामध्ये केलेले आहे. श्रीदत्तमहात्म्य हा श्रीदत्त आणि श्रीस्वामी संप्रदायातील एक अत्यंत महत्वपूर्ण आणि त्वरित फलश्रुती देणारा ग्रंथ आहे. कलियुगातील उपास्य दैवत म्हणजे श्रीदत्तात्रेय हे आहे. सर्वांचे कल्याण करणारे आणि सर्वांवर कृपा करणारे असे दैवत म्हणजे श्री दत्तात्रेय हे आहे. श्री दत्तात्रेय स्मतृगामी असून भक्तांच्या कामना पूर्ण करणारे आणि संकटांचे हरण करणारे असे दैवत आहे. श्री दत्तात्रेयांच्या जीवन लीला, त्यांचे भक्त, त्यांचे शिष्य आणि श्रीदत्त संप्रदायाची महती वर्णन करणारा ग्रंथ म्हणजे श्री दत्तमहात्म्य हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक असून स्त्री-पुरुष सर्वांना याचे पारायण करता येते. श्री गुरुचरित्र प्रमाणेच श्रीदत्तमहात्म्य या ग्रंथाचे स्थान असून हजारो भक्तांना या ग्रंथाच्या अद्भुत अनुभूती आणि कृपा आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत. या पवित्र ग्रंथामध्ये कार्तवीर्य सहस्त्रार्जुन, अलर्क, जंभासुर, सुशीला, मदालसा, रेणुका, परशुराम इ. अनेक भक्तांचा कथा आलेल्या आहेत. श्रीदत्त मार्गात प्रपंचतील दुःखाच्या वेदना कमी होण्यासाठी श्रीदत्तांना प्रार्थना केली आहे. योगातल्या क्रिया, आसने, प्राणायाम या गोष्टी प्रापंचिकालासुद्धा किती गरजेच्या आहेत, हे आज जगात सर्वांना मान्य झालेले आहे. श्रीदत्तमहात्म्यात योगातल्या क्रियांचे वर्णन आहे. या ग्रंथाची मंत्रात्मकता व मंत्रमयता विलक्षण आहे. प्रत्यक्ष श्रीदत्त प्रभुंनी या अक्षराअक्षरात आपले वास्तव्य केले आहे. शिवाय प्रपंचातील विविध संकटे, समस्या, व्यथा इ. साठी कोणकोणती बीजमंत्रात्मक अक्षरे लावून जप करावा, याचे रहस्य खुले केले आहे. त्या त्या मंत्राच्या अनुष्ठानाने ते ते फल प्राप्त होते, असा आज सर्वांना अनुभव आहे. भक्ती, मुक्ती, मार्गदर्शन आणि तेही सालंकृत काव्यात असा हा अद्वितीय ग्रंथ आहे. श्रीदत्त महात्य या ग्रंथात कार्तवीर्य हा पूर्ण बदलला, समर्पित झाला व मुक्त झाला. अलर्क पूर्वार्धात जुलमी होता. तो श्रीदत्त भेटीनंतर विरक्त, शांत मुमुक्षु बनला. अप्सरेच्या ओल्या वस्त्राचे थेंब पडताक्षणी राक्षसात परिवर्तन घडले. सत्ता असूनही त्याच्या व्यक्तित्वात बदल झाला. आधीची रेणुका पतिप्रता असूनही मानवी मन असलेली होती. पुन्हा जिवंत झालेली रेणुका एकदम देवी झाली. दैवी कृपेने परिवर्तन घडते तरीही आपली एकूण वृत्ती प्रपंचासक्त राहते. ‘तू दंडिताही, आम्ही पापी, पुनरपि चुकत तथापि' अशी करुणा आपल्यासाठी प. प. श्री स्वामींनी केली आहे. साधकाचे सिद्धात होणारे परिवर्तन हे मोठेचे वैशिष्टचपूर्ण आहे. हा चिंतन वर्ग आपल्या जीवनात आध्यात्मिक आणि दैवी शक्तीची खात्रीने अनुभूती मिळवून देईल असा विश्वास वाटतो.
प्रख्यात वक्ते, प्रवचनकार, संस्कृत व धर्मशास्त्र विद्वान
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र