सायबर सुरक्षा
Contact us

विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांसह सर्व डिजिटल वापरकर्त्यांसाठ

₹799

आजच्या डिजिटल युगात स्मार्टफोन व इंटरनेटच्या वाढत्या वापरासोबत ऑनलाईन फसवणूक, हॅकिंग आणि सायबर गुन्ह्यांचा धोका प्रचंड वाढला आहे. आपल्या कष्टाचा पैसा, वैयक्तिक माहिती व डिजिटल अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी ही विशेष सायबर सुरक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत फिशिंग, बनावट वेबसाईट, फसवे मेसेज, यूपीआय फ्रॉड, क्यूआर कोड स्कॅम, केवायसी व नोकरीचे फेक स्कॅम्स कसे ओळखावेत याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. तसेच सोशल मीडिया प्रायव्हसी, मोबाईल ॲप परवानग्या, सुरक्षित ब्राऊझिंग, अकाऊंट हॅक झाल्यास पासवर्ड रिसेट व सायबर तक्रार निवारणाची संपूर्ण माहिती प्रात्यक्षिकांसह मिळेल. विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांसह सर्व डिजिटल वापरकर्त्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल अशी कार्यशाळा

कार्यशाळेतील विषय

✅ Phishing, Fake वेबसाईट्स आणि Social Engineering कसे ओळखावे?
✅ फसवे एसएमएस, ईमेल, Links, बनावट वेबसाइट आणि लॉगिन पेजेस कसे ओळखावे?
✅ सोशल मीडियावरील वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवावी?
✅ ओटीपी, PIN आणि यूपीआय Frauds पासून संरक्षण
✅ क्युआर कोड, पेमेंट आणि Fake पेमेंट स्क्रीनशॉट स्कॅम
✅ Fake कस्टमर केअर, केवायसी, नोकरी, इनव्हेस्टमेंट आणि लॉटरी स्कॅम
✅ मोबाईल अॅपच्या Permissions आणि Privacy सेटिंग

✅ Browser Privacy, Saved Passwords, Cookies आणि Website Permissions कसे तपासावेत?

✅ Suspicious Files आणि Malware कसे ओळखावे?
✅ Public Wi-Fi आणि Public Computers सुरक्षितपणे कसे वापरावेत?
✅ अकाऊंट हॅक झाल्यास Password Reset, MFA आणि Session Logout कसे करावे?
✅ Cyber Fraud झाल्यानंतर तातडीची पावले आणि तक्रार प्रक्रिया
✅ Phishing ते Account Recovery असा Complete Cyber Attack Simulation
✅ प्रत्यक्ष डेमो, उदाहरणे, Quiz आणि Hands-on Activities वर आधारित प्रशिक्षण

अतुल कहाते

सुप्रसिद्ध लेखक, व्याख्याते, एआय व आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्गदर्शक

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याचा 25 वर्षांचा अनुभव, तसेच या क्षेत्रामधील विविध अभ्यासक्रम शिकवण्याचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. सध्या सी-डॅक, पुणे इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे अभ्यासक्रम शिकवण्याचे काम

  • माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनुभव - सिंटेल, अमेरिकन एक्सप्रेस, डॉयचे बॅंक, एलअॅंडटी इन्फोटेक, आयफ्लेक्स सोल्युशन्स (आता ओरॅकल) आणि आरआयए ऍडव्हायजरी इथे विविध प्रकारच्या जबाबदार्‍या सांभाळल्या, ओरॅकलमध्ये तंत्रज्ञान विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेक आव्हानात्मक तंत्रज्ञानविषयक प्रकल्पांची उभारणी/हाताळणी. अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, सिंगापूर इथे काम करण्याचा अनुभव.
  • 80 पुस्तकांचे लिखाण - इंग्रजीमध्ये 30 आणि मराठीत 50 - संगणकक्षेत्रातल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच प्रोफेशनल्ससाठी नेटवर्क सिक्युरिटी, वेब टेक्नॉलॉजी, ऑपरेटिंग सिस्टिम्स, डेटाबेस मॅनेजमेंट, डेटा कम्युनिकेशन्स, सी प्लस प्लस अशा अनेक पाठ्यपुस्तकांचे लिखाण, त्यामधली काही पुस्तके भारतामधल्या तसेच काही परदेशांमधल्या जवळपास 50 विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तक म्हणून वापरली जातात, दोघांचा चिनी भाषेत अनुवाद
  • मराठीमध्ये इतिहास, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, क्रिकेट अशा वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

29 सप्टें. ते 2 ऑक्टो. 2026 

संध्या. 8 ते 9  

ऑनलाईन सत्र 

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

लाईव्ह मार्गदर्शन 

अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी   

सुसंस्कारित अभ्यासक्रम 

तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम

कम्युनिटी व नेटवर्किंग

एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क

तज्ज्ञ मार्गदर्शक

आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे 

मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान 

ई - प्रमाणपत्र 

कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र