छत्रपती शिवाजी महाराजांची व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कौशल्ये
Contact us

₹2,899

'स्वराज्यकर्ते' शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी एक प्रेरक सूत्र आहे! ह्याच प्रेरकसुत्राच्या इतर अनेक सुत्रांमधील सर्वात महत्त्वाचे आहे 'सुराज्यकर्ते' हे सूत्र. ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण त्याचेच अध्ययन करणार आहोत. 
'सुराज्या'साठी अर्थातच लागते ती उत्कृष्ट प्रशासकीय चौकट (Administrative Management), उत्तम अर्थव्यवस्थापन (Finance management) आणि मनुष्यबळ विकासाची दृष्टी (Human Resource Management)! महाराजांनी 350 वर्षांपूर्वी ती पुरवली आणि एक चमत्कार याच देशात संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीतही घडला; जो आजही आपल्या उद्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
He used to Think Global and Act Local
मराठे, हिंदू केवळ मुकादम आणि कारकूनच घडवीत नाहीत तर स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रगतिशील राज्यकर्तेही घडवतात हा नवसाक्षात्कार त्यांनी हिंदुस्तानला आणि तो गिळू पाहणाऱ्या अनेक परकीयांनाही दिला. संपूर्ण भारतीय हिंदू परंपरेतल्या राजकीय विचारांचा मूर्तीमंत आणि परिपूर्ण आविष्कार म्हणजेच छत्रपती शिवराय !
दूरदर्शी, सम्यक प्रशासकीय धोरणे शिवरायांनी कशी आखली, राबवली ते ह्याच अभ्यासक्रमात शिकता येईल. संपत्तीची निर्मिती, संपत्तीचा विनियोग आणि संपत्तीचे वाटप या प्रभावी तिसूत्री नुसार उत्तम, शिलकी अर्थव्यवस्थापन कसे करता येते तेही इथे शिकायला मिळेल. वरील धोरणांबरोबरच राजकीय, सामाजिक बदल घडवून उत्तमरीत्या 'मनुष्यनिर्माण' कसे करता येते हेही शिवरायच समजावतील, त्यांच्या चरित्रातून !
'He converted Lambs into Lions' असे डॉ. बाळकृष्ण यथार्थपणे का म्हणत असत त्याचाही ह्याच अभ्यासक्रमामध्ये प्रत्यय येईल. तर शिकू या, जाऊ या ओजस्वी भूतकाळातून उज्वल भविष्याकडे ! 2047 कडे
जय शिवराय!

मार्गदर्शक 

डॉ. अजित आपटे

BA, MPM, DMM,DITM, PhD

शिवचरित्र संशोधक, अभ्यासक, लेखक, शिवाजी महाराज -आधुनिक व्यवस्थापन विषयावर शेकडो व्याख्याने, व्यवस्थापक – जाणता राजा महानाट्य, 
व्यवस्थापन व जनसंपर्क क्षेत्रात 35 वर्षे कार्यरत, शिवाजीमहाराज आणि आधुनिक व्यवस्थापन, गुंतवणूक, करियर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर व्याख्याने
वारसा भ्रमण (हेरिटेज वॉक) पुणे यामध्ये सहभाग

अभ्यासक्रम 

भाग 1

कुशल सुशासनाचा वस्तुपाठ

1) सुनिश्चित ध्येय
2) व्यवस्थाकेंद्रीत दृष्टिकोन
3) जनताभिमुख प्रशासन
4) महाराज आणि पर्यावरण
5) दुर्गकेंद्रित प्रशासन
6) प्रशासनविषयक पत्रे

भाग 2

यशस्वी अर्थकारण

1) अर्थमूलो हि धर्म:
2) प्रजाभिमुख अर्थव्यवस्था
3) अर्थव्यवस्थापनाचा मानवी चेहरा
4) व्यापारी अनुसंधान
5)पैसा वाचवणे म्हणजे पैसा कमावणे - वाटाघाटीतील कौशल्य
6)अंतिम फलित

भाग 3

मानव संसाधनांचे प्रभावी योजन, विकास व चरित्र निर्माण

1) संकल्पना आणि अंमलबजावणी
2) मानव संसाधन विकास - कां आणि कसा ?
3) निवड आणि भरती - सर्वसमावेशक धोरण
4) मानव निर्माण – राष्ट्र निर्माण
5) कोकरांचे रूपांतर सिंहांमध्ये कसे झाले?
6) योजकस्तत्र दुर्लभ:

भाग 4

आजची उपयुक्तता आणि उपयोजन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापकीय कौशल्यांची आजची उपयुक्तता आणि उपयोजनाचा दृष्टिकोन

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

1 ते 24 जुलै 2026 

सोम ते शनि - संध्या 8 ते 9 

अभ्यासक्रमात समाविष्ट तीन अभ्यास ग्रंथ घरपोच पाठविण्यात येतील.

ई-प्रमाणपत्र नमूना 

अभ्यासक्रम व वेळापत्रक