आज मार्केटमध्ये ब्रँडिंगचे महत्व खूप आहे. कारण आजचा स्मार्ट ग्राहक ब्रँडेड वस्तू विकत घेण्याला अधिक पसंती देतो. त्यांच्यासाठी सेवा अथवा वस्तू विकत घेताना ब्रँडेड म्हणजे ट्रस्टवर्दी हे समीकरण जुळलेले आहे, म्हणून तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू लोकांच्या मनात निर्माण झालेल्या परसेप्शनवर ठरते. यात सोशल मिडीया महत्वाची भूमिका बजावतो. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला स्वतःचा ब्रँड उभा करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. योग्य स्ट्रॅटेजी, ब्रँड बिल्डिंग आणि प्रभावी कम्युनिकेशन यांच्या मदतीने ही संधी थेट business growth आणि conversions मध्ये रूपांतरित करता येते.
लहान व्यावसायिकांना या सर्व गोष्टींसाठी मोठ्या डिजिटल आणि ब्रँडिंग एजन्सीजवर अवलंबून राहणे शक्य नसते. अशा व्यावसायिकांसाठी अणि या क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्यांसाठी ब्रँड स्ट्रॅटेजी आणि सोशल मीडिया मास्टरक्लास महत्वाचा ठरतो. मास्टरक्लासमध्ये सहभागी ब्रँड तयार करण्याची दिशा, सोशल मीडियाचा स्ट्रॅटेजिक वापर आणि कंटेंटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे या स्किल्सवर भर दिलेला असेल.
ही कार्यशाळा विशेषतः उद्योजक, छोटे व्यवसाय मालक, क्रिएटर्स, फ्रीलान्सर्स आणि डिजिटल क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. स्पर्धात्मक बाजारपेठेत ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे, त्यांना विश्वासात रूपांतरित करणे आणि त्यातून व्यवसाय वाढ साध्य करणे या दृष्टीने ही मास्टरक्लास महत्वाचा आहे.
1
मास्टरक्लास कुणासाठी आहे?
✅ उद्योजक आणि छोटे व्यवसाय मालक
✅ क्रिएटर्स आणि फ्रीलान्सर्स
✅ सोशल मीडिया क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे
✅ स्वतःचा पर्सनल ब्रॅंड, कंटेन्ट क्रिएशन करू इच्छिणार्या महिला
✅ मार्केटिंग आणि डिजिटल क्षेत्रातील विद्यार्थी
2
मास्टरक्लास मध्ये काय शिकाल?
✅ ब्रँड म्हणजे काय आणि तो कसा तयार करायचा
✅ सोशल मीडियावर वेगळेपण कसं निर्माण करायचं
✅ कंटेंट स्ट्रॅटेजी आणि स्टोरीटेलिंग
✅ ऑडियन्सशी कनेक्ट होण्याचे मार्ग
✅ 30 दिवसांचा सोशल मीडिया अॅक्शन प्लॅन
3
मास्टरक्लासची वैशिष्ट्ये
✅ प्रॅक्टिकल आणि अॅक्टिव्हिटी-आधारित सेशन्स
✅ वास्तविक उदाहरणांवर आधारित मार्गदर्शन
✅ ब्रँड आणि कंटेंट फ्रेमवर्क्स
✅ पर्सनल ब्रँड तयार करण्यासाठी मार्गदर्शन
4
मास्टरक्लासचे फायदे
✅ ब्रँड व्हॉईस तयार करणे
✅ सोशल मीडिया स्ट्रॅटेजी बनवणे
✅ T - शेप कंटेंट क्रीएशन
✅ बिझनेस ग्रोथ
विशाखा विश्वनाथ
साहित्य अकादमी युवा पुरस्कार प्राप्त कवयित्री असून ब्रँड कम्युनिकेशन आणि डिजिटल स्ट्रॅटेजी क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी 300+ विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्या LensKathaa Brand ब्रँडिंग एजन्सीच्या संस्थापक असून मनोरंजन, प्रॉडक्शन हाऊसेस, लाईफ स्टाईल ब्रॅण्ड्स, हॉस्पिटॅलिटी, रियल इस्टेट या क्षेत्रात डिजिटल स्ट्रॅटेजीस्ट म्हणून 6 वर्षाहून अधिक काळ काम पाहिलेले आहे.