पुस्तक परिचय / परीक्षण
Contact us

₹799

तुम्ही उत्तम वाचक आहात? वाचलेल्या पुस्तकाबद्दल मनात खूप काही साठलेलं असतं, पण ते शब्दांत कसं उतरवावं हे सुचत नाहीये का? मग विश्व मराठी परिषद आयोजित ही ऑनलाईन कार्यशाळा खास तुमच्यासाठी आहे!

शब्दांना देऊया अनुभूतीची जोड... आपल्याला आवडलेल्या पुस्तकाविषयी खूप बोलायला आवडतं... पण ते प्रभावीपणे 'लिहिणं' हे एक शास्त्र आणि कला आहे. कधी आपल्याला केवळ पुस्तकाची ओळख करून द्यायची असते, तर कधी त्याचा सखोल आस्वाद मांडायचा असतो. सोशल मीडिया - समाजमाध्यमांच्या युगात तर प्रत्येक वाचकाला एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध आहे. पण हे लेखन वाचनीय, तर्कसुसंगत आणि परिणामकारक कसं असावं?

'वाचक', परीक्षक ते 'समीक्षक' या प्रवासातील नेमके टप्पे समजून घेण्यासाठी ही कार्यशाळा एक सुवर्णसंधी आहे. आपल्या वाचनाला लेखनाची जोड देऊन, तुमच्यातील लेखकाला दिशा देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न! या कार्यशाळेत आपण काही तंत्र आणि काही मंत्र समजून घेऊ... म्हणजे पुस्तकांवर लिहिणे होईल अधिक आत्मविश्वासपूर्ण...अधिक समाधानकारक आणि अधिक आनंददायी ..!

01

कार्यशाळेतील विषय

✅ आस्वाद, परिचय आणि परीक्षण: या तिन्ही संकल्पनांमधील नेमका फरक आणि त्यांचे महत्त्व
✅ वाचनाचा दृष्टिकोन: परीक्षण करण्याच्या उद्देशाने पुस्तक कसे वाचावे?
✅ लेखनाची पूर्वतयारी: टिपणे काढण्यापासून ते आराखडा तयार करण्यापर्यंतचा प्रवास
✅ परिणामकारक सुरुवात: वाचकाचे लक्ष वेधून घेणारी प्रस्तावना कशी लिहावी?
✅ विषयाची मांडणी: पुस्तकाचा गाभा आणि त्यातील आशयाचे तर्कशुद्ध विश्लेषण

02

कार्यशाळेतील विषय

✅ पुस्तकांचे प्रकार : त्यानुसार घटक चर्चा, विश्लेषण व निकष
✅ लेखन शैली: क्लिष्टता टाळून ओघवती आणि रसाळ भाषा कशी वापरावी?
✅ वस्तुनिष्ठता विरुद्ध व्यक्तिगत मत: परीक्षणात स्वतःचे मत मांडताना तोल कसा सांभाळावा?
✅ सोशल मीडिया लेखन: फेसबुक, इंस्टाग्राम आणि ब्लॉगसाठी 'शॉर्ट अँड स्वीट' रिव्ह्यूचे तंत्र.
✅ प्रत्यक्ष लेखन आणि सुधारणा: लेखनातील सामान्य चुका कशा टाळाव्या आणि स्वतःचे लेखन कसे तपासावे?

03

ही कार्यशाळा कोणासाठी उपयुक्त आहे?

✔️ साहित्य प्रेमी आणि वाचक: ज्यांना आपले वाचन अनुभव जगासमोर मांडायचे आहेत.
✔️ विद्यार्थी आणि शिक्षक/प्राध्यापक : ज्यांना मराठी साहित्याची समज वाढवून लेखन कौशल्य विकसित करायचे आहे.
✔️ नवोदित लेखक, साहित्याचे अभ्यासक : ज्यांना समीक्षा क्षेत्रातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे.
✔️ ब्लॉगर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स : ज्यांना पुस्तकांवर आधारित दर्जेदार कंटेंट तयार करायचा आहे.
✔️ ग्रंथ प्रकाशक : मार्केटिंगसाठी ज्यांना पुस्तकाचा प्रभावी परिचय करून द्यायचा आहे.

04

कार्यशाळेचे स्वरूप :

✔️ या कार्यशाळेत मार्गदर्शनासोबत प्रत्यक्ष लेखन आणि प्रश्नोत्तरातून तुमच्या शंकांचे निरसन केले जाईल!

✔️ सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्र मिळेल
✔️ सर्वांना कार्यशाळेचे रेकॉर्डिंग मिळेल

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

प्रख्यात लेखिका, संपादिका, समीक्षक आणि अभिवाचक

तज्ज्ञ मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

26 ते 29 मे, 2026

संध्या. 8 ते 9