बारोमास व्याख्यानमाला
Contact us

FREE

आपल्या महाराष्ट्राला वक्ते आणि व्याख्यानमाला अशी उत्तम परंपरा आहे. प्र. के. अत्रे, ना. सी. फडके यांच्या पूर्वीपासून ते पु ल देशपांडे, शंकर पाटील, प्रा. राम शेवाळकर, प्रा शिवाजीराव भोसले अशी ही वक्त्यांशी मोठी मांदियाळी आहे. वसंत व्याख्यानमाला आपल्याला माहित आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा व्याख्यानमाला होत असतात. एक वैचारिक मेजवानी... एक बौद्धिक खाद्य म्हणून समाजमानस घडविण्यामध्ये या व्याख्यानमाला महत्त्वाची भूमिका बजावतात. माणसाला जशी पोटाची भूक असते, तशीच मनाची भूक असते, बुद्धीची भूक असते, आत्म्याची भूक असते. विविध विषयांवरील व्यासंगी विद्वानांचे, तज्ञांचे विचार ऐकणे, त्यांचे मार्गदर्शन लाभणे हे माणसाच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी सहाय्यभूत ठरते. मात्र ही व्याख्याने ऐकण्यासाठी आपल्याला प्रत्यक्ष वेळ काढून सभागृहात जावे लागते. व्याख्याने ऐकल्यावर ती आपल्या स्मृतीमध्ये जमा होतात. त्या व्याख्यानांचा आपल्या सुप्त मनावर परिणाम होतो. परंतु ती व्याख्याने आपल्याला पुन्हा ऐकता येत नाहीत.

आज आधुनिक तंत्रज्ञान हे सर्वांसाठी एक मोठे साधन बनले आहे. त्याचा प्रभावी उपयोग करून घर बसल्या कुटुंबातील सर्वांना व्याख्यानांचा लाभ घेता यावा, त्यांच्या ज्ञानात भर पडावी, त्यांना बौद्धिक आनंद मिळावा म्हणून विश्व मराठी परिषदेने ऑनलाईन पद्धतीने बारोमास व्याख्यानमाला हा उपक्रम सुरू केला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आपल्याला घरबसल्या व्यासंगी विद्वान वक्त्यांची भाषणे आणि व्याख्याने ऐकता येणार आहे. त्यांचे रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्ती ही व्याख्याने ऐकू शकणार आहेत. पुन्हा पुन्हा ऐकू शकणार आहेत.

विषय : इतिहास, कला, संस्कृती, ज्ञान परंपरा, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक, राष्ट्रीय, वैश्विक, राजकीय तथा समकालीन परिस्थितीवर भाष्य करणारे, इ.

मान्यवर व्याख्याते

व्याख्यान व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन व्याख्यान ZOOM द्वारे 

दर शनिवार व रविवार 

रात्री 8:30 ते 9:45 

मान्यवर व्याख्याते

David Smith

CEO & Founder

Milla Clarke

Project Manager

Jonathan Rugg

Developer

Sarah Anderson

Web Designer

David Smith

CEO & Founder

Milla Clarke

Project Manager

Jonathan Rugg

Developer

Sarah Anderson

Web Designer

David Smith

CEO & Founder

Milla Clarke

Project Manager

Jonathan Rugg

Developer

Sarah Anderson

Web Designer

Lorem Ipsum is simply dummy text

Lorem Ipsum has been the industry's standard dummy text ever since the 1500s, when an unknown printer took a galley of type and scrambled it to make a type specimen book.

आयोजक

प्रा. क्षितिज पाटुकले

संकल्पना

प्रा. मिलिंद जोशी

प्रमुख मार्गदर्शक

प्रा. अनिकेत पाटील

निमंत्रक

वेळापत्रक