क..क..कवितेचा
Contact us

₹499

"अडगुलं मडगुलं.." पासून जी कविता मुलांच्या आयुष्यात शिरते, ती पुढे "खबडक खबडक..." करत शालेय पाठ्यपुस्तकांकडे जाऊन थांबते. "हिरवे हिरवे गार गालिचे.." क्वचितच एखाद्या मनाला गारवा देताना दिसतात. असं का होत असावं बरं...?

कविता ही बालवयातच उकलून दाखवली, किंवा चुकून आपोआप एखाद्याला उमगली, तरच ती पुढे "मनाच्या धुंदीत लहरीत.." राज्य करू लागते.

आपल्या भाषेची ही सौंदर्यस्थळं आपणच पुढच्या पिढीला बोट धरून दाखवली पाहिजेत!

चला तर मग! हसत खेळत मुलांना मुलांच्या भाषेत कवितांचं तंत्र, त्यातलं मर्म, त्यातली गोष्ट, संगीत समजावून देणारा हा 'क - कवितेचा' गिरविलाच पाहिजे!


कविता समजून घेताना:
१) कविता म्हणजे काय?
२) कवितांचे प्रकार
३) विविध विषयांवरच्या कवितांची ओळख
४) बालकवींच्या विविध कवितांची ओळख
५) कविता पाठांतर का आणि कसं?
६) कविता कशा म्हणाव्यात?
७) कवितांमधलं संगीत
८) कवितांमध्ये लपलेल्या कथा
९) कवितेची भाषा समजून घेणे
१०) यमकाची मज्जा
११) कविता बांधणीचा प्रयत्न

प्रज्ञा वझे 

लेखिका, कथाकथनकार, सृजनात्मक लेखन प्रशिक्षिका,.

तज्ज्ञ मार्गदर्शक

प्रात्यक्षिके व प्रश्नोत्तरे

रेकॉर्डिंग उपलब्ध 

ऑनलाईन वर्ग - ZOOM द्वारे 

2 ते 5 जून 2026

संध्या 7 ते 8