अष्टांग योग
Contact us

सर्व वयोगटातील, सर्व कार्यक्षेत्रातील व्यक्तींच्या निरोगी आरोग्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासित करण्यासाठी

₹799

मार्गदर्शक : भाग्यश्री खांडवेकरभाषा : Marathi

कार्यशाळेतील विषय

योग ही आपल्या भारतीय प्राचीन ज्ञान परंपरेचाच एक अमूल्य ठेवा आहे. पतंजलिंसारख्या महामुनिंनी आपल्याला जीवन जगण्याची कला या अष्टांगयोगाद्वारे शिकवली आहे. पातंजल योगसूत्र, हठयोगातील काही ग्रंथ तसेच काही योगोपनिषदात अष्टांग योगाचा उल्लेख आढळतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधि ही योगाची आठ अंगे आहेत. यांतील प्रत्येक अंग हे जीवन जगणे सुसह्य व परिपूर्ण करून जीवनाचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी मदतनीस आहे. योग म्हणजे फक्त आसन किंवा प्राणायाम ही एक फार मोठी अवधारणा आज जनमानसात पसरली आहे. परंतु आधुनिक जीवनशैलीमध्ये या आठही अंगांच्या दृष्टीने साधना करणे आवश्यक आहे.  हे प्राचीन शास्त्रांतील ज्ञान हजारो वर्षे तसेच टिकून राहण्यामागे एकच कारण आहे की, ते  ज्ञान आधूनिक जीवनशैलीलाही तसेच्या तसे लागू पडते. संतोषादि नियम, अहिंसादि यम यांच्या अभावी जीवन आजही दयनिय व त्रासदायी होईल म्हणून आपले दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी अष्टांग योगाचा अभ्यास व आचरण करणे आवश्यक आहे.

📍 कार्यशाळेचे उद्दिष्ट :  अष्टांगयोग या प्राचीन ज्ञानाची आधुनिक जीवनाशी सांगड घालणे हे आहे. सर्व वयोगटातील व कार्यक्षेत्रातील लोकांनी आरोग्य, कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच व्यक्तिमत्त्व विकासित करण्यासाठी या कार्यशाळेत प्रवेश घ्यावा. 

कार्यशाळेतील विषय : 

✅ योग म्हणजे काय?
✅योगाबद्दल असलेले समज - गैरसमज
✅अष्टांग योगाचे आठ अंग - प्रत्येक अंगाचे ग्रंथ आधारे संक्षिप्तविवेचन
✅ निरोगी आरोग्य व स्वास्थ्य रक्षणासाठी अष्टांग योग
✅ मानसिक आरोग्य व मनोधैर्य वर्धनासाठी अष्टांग योग
✅ व्यक्तिमत्त्व व सर्वांगीण विकासासाठी अष्टांग योगाचा उपयोग
✅ अष्टांग योग अभ्यासकांना शासकीय/खाजगी क्षेत्रांतील भारतातील व परदेशातील व्यावसायिक संधी
✅ अष्टांग योग विषयक विविध पूर्णवेळ/अर्धवेळ, ऑनलाइन/दूरस्थ अभ्यासक्रम याविषयी माहिती

भाग्यश्री खांडवेकर 

प्राध्यापिका, योग प्रशिक्षक, अष्टांग योग व चक्र मॅपिंग तज्ज्ञ

ऑनलाईन सत्र 

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

लाईव्ह मार्गदर्शन 

अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी   

सुसंस्कारित अभ्यासक्रम 

तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम

कम्युनिटी व नेटवर्किंग

एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क

तज्ज्ञ मार्गदर्शक

आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे 

मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान 

ई - प्रमाणपत्र 

कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र