There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
नवोदित लेखक / संशोधकांसाठी, मीडिया क्षेत्रातील लोकांसाठी (न्यूजरीडर, रिपोर्टर, ब्लॉगर), शिक्षक / प्राध्यापकांसाठी, आपल्या दैनंदिन जीवनात एआयचा प्रभावी वापर करू इच्छिणाऱ्या सर्व व्यक्ति, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी सर्वांसाठी...
आजच्या डिजिटल युगात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (AI) ही काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञानाची ही ताकद आपल्या दैनंदिन कामात स्मार्ट पद्धतीने कशी वापरावी, हे शिकवण्यासाठी आम्ही 'सर्वांसाठी एआयचा वापर' ही विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे! यात तुम्ही ChatGPT आणि Gemini सारख्या टूल्सची सोपी ओळख व अचूक 'प्रॉम्प्ट' देण्याचे तंत्र शिकाल. शिक्षक उत्तम लेसन प्लॅन व प्रेझेंटेशन्स बनवायला शिकतील, तर लेखक आणि पत्रकार स्वतःची मूळ शैली जपत ब्लॉग, बातम्या आणि स्क्रिप्ट्स लीलया तयार करू शकतील. आकर्षक फोटो-व्हिडिओ निर्मिती, भाषांतर, रिसर्च आणि तथ्य पडताळणी (Fact-check) आता अधिक सोपी होईल. फेक न्यूज आणि डेटा प्रायव्हसी सांभाळून, लॅपटॉप व मोबाईलवर प्रत्यक्ष डेमोद्वारे सुरक्षित AI चा वापर शिकण्यासाठी आजच आपली नोंदणी निश्चित करा!
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक कंपन्यांमध्ये काम करण्याचा 25 वर्षांचा अनुभव, तसेच या क्षेत्रामधील विविध अभ्यासक्रम शिकवण्याचा 25 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. सध्या सी-डॅक, पुणे इथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाविषयीचे अभ्यासक्रम शिकवण्याचे काम
1
2
3
4
अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी
तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम
एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क
आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक
मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान
कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र