अध्यात्म आणि जीवन
Contact us

अध्यात्म आणि जीवन

प्रत्येकाने अध्यात्म शास्त्र समजून घेतले पाहिजे आणि आपले जीवन आनंदी, सुखी, समाधानी करून घेतले पाहिजे...

मार्गदर्शक : प्रा. क्षितिज पाटुकले

₹799

कार्यशाळेविषयी माहिती

अध्यात्म हा भारताचा आत्मा आहे. सनातन भारतीय सभ्यता अध्यात्मामुळेच आजही जीवित आणि प्रवाहित आहे. संपूर्ण जग भारताकडे विश्व गुरु म्हणून पहात आहे. याचे कारण भारताची आध्यात्मिक मूल्ये आणि त्यांचा हजारो वर्षांपासून वाहत असलेला चिरंतन प्रवाह... पण हे अध्यात्म म्हणजे नक्की काय हे आपल्याला माहीत नसते. कळत नसते. समजून घ्यायचा प्रयत्न केला तर अनेकदा गोंधळ उडतो. संभ्रमावस्था निर्माण होते. मोठ-मोठे गुरु आणि त्यांचे भव्य आश्रम, त्यातील पंचतारांकित सुख सोयी, भक्तांचे थवेच्या थवे पाहून आपण स्तिमित होतो. त्याचवेळी विविध तीर्थक्षेत्रे, कुंभमेळे, वारीत चालणारे लाखो वारकरी पाहून आपल्याला वाटते की यात काहीतरी तथ्य आहे. मग आपणही एक-दोन दिवसांची वारी करतो. कुंभात स्नान करून येतो. काही तीर्थक्षेत्री यात्रा करतो. काही गुरूंना भेटतो. त्यांचे दर्शन होते. पण हे सगळे करूनही आपल्याला काही "क्लिक" होत नाही. आपल्याला समाधान मिळत नाही. उलट अनेकदा आपल्या संभ्रमावस्थेमध्ये भर पडते  आणि असे वाटते की आपण या वाटेला जाऊच नाही. असे वाटायचे महत्त्वाचे कारण आहे की आपण अध्यात्म म्हणजे काय ते नीट समजून घेत नाही. त्याचा पुरेसा गांभीर्याने विचार करत नाही. गुरू म्हणजे काय, अनुग्रह आणि दीक्षा म्हणजे काय? मोक्ष आणि मुक्ती म्हणजे काय ते समजून घेत नाही. त्यामुळे एका विलक्षण आणि दैवी अशा ज्ञान परंपरेला, श्रीगुरु परंपरेला आपण पारखे होतो. त्यापासून वंचित राहतो.

भारत ही मोक्ष भूमी आहे. भारत सोडून इतर जग हे भोग भूमी आहे. भारतात जन्म होणे हे अत्यंत भाग्याचे आहे. त्याचबरोबर अध्यात्म शास्त्राचे ज्ञान होणे हेही तितकेच आवश्यक आहे. त्यातूनच आपण निःश्रेयस अभ्युदय म्हणजे ऐहिक जीवनात प्रगती आणि मृत्यूनंतर सद्गती प्राप्त करून घेऊ शकतो. प्रत्येक भारतीयाने अध्यात्म शास्त्र समजून घेतले पाहिजे आणि आपले जीवन आनंदी, सुखी, समाधानी करून घेतले पाहिजे...

🗓️20 ते 23 जानेवारी, 2026
⏱️ रात्री 7:30 ते 8:30
🎥 ऑनलाईन वर्ग : Zoom द्वारे

✅अध्यात्म म्हणजे काय ? व्याख्या 
✅धर्म, संप्रदाय आणि अध्यात्म 
✅अध्यात्म्याची गरज आणि उपयुक्तता 
✅अध्यात्म आणि विज्ञान 
✅मुमुक्षुत्व, उपासना पद्धती आणि नवविधा भक्ती 
✅ज्ञान, भक्ती, कर्म आणि योग (अष्टांग आणि हठ योग) मार्ग 
✅अध्यात्म आणि कर्मकांड, व्रते, यात्रा, परिक्रमा, पाप पुण्य, स्वर्ग नरक संकल्पना 
✅मोक्षाची संकल्पना आणि पुनर्जन्म सिद्धांत 
✅मुक्ती म्हणजे काय ? युक्तीचे प्रकार, मुक्तीचे प्रकार
✅जीवनाचे ध्येय आणि आनंदाची व्याख्या 
✅गुरु आणि गुरुतत्व, दीक्षा, अनुग्रह आणि गुरु - शिष्य परंपरा 
✅जीवनात गुरु करणे आणि अनुग्रह किंवा दीक्षा आवश्यक आहे का ?
✅गुरु कसा ओळखावा ? अर्थात शोध श्रीगुरुंचा.. 
✅अध्यात्ममुळे जीवनामध्ये कोणते फायदे होतात ? 
✅अध्यात्म आणि जीवनाचा परस्पर पूरक आणि परस्पर पोषक प्रवास

प्रा. क्षितिज पाटूकले 

प्रख्यात लेखक, अध्यात्म क्षेत्रातील जाणकार साधक, भारतीय ज्ञान परंपरा तज्ञ, संस्थापक - भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेज सिस्टिम आणि कीर्तन विश्व युट्यूब चॅनेल

कार्यशाळेतील सत्र 

कार्यशाळेची वैशिष्ट्ये

लाईव्ह मार्गदर्शन 

अत्यंत अनुभवी व नामवंत व्यक्तींकडून प्रत्यक्ष शिकण्याची, शंका समाधान करून घेण्याची अपूर्व संधी   

सुसंस्कारित अभ्यासक्रम 

तज्ज्ञ मार्गदर्शकांनी तयार केलेला अभ्यासक्रम

कम्युनिटी व नेटवर्किंग

एकसमान क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील व्यक्तींशी कायमस्वरूपी संवाद व संपर्क

तज्ज्ञ मार्गदर्शक

आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व नामवंत मार्गदर्शक

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे 

मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान 

ई - प्रमाणपत्र 

कार्यशाळेत सहभागी प्रत्येक व्यक्तीला ई प्रमाणपत्र